चातुर्मास प्रवचने

महाराजांची प्रत्येक वर्षात चातृमासाची तथा श्रावण महिन्याची अनुष्ठाने होत असतात.प्रथमतः झालेली मुंबईची प्रवचने लोकात भावभक्तिश्रध्दा वर्धित करणारी ठरली.

मुंबई

मुंबई येथे चार धाम मंदिर तथा तुकाराम महाराज मंदिर सदगुरू दादा महाराज सातारकर वाडी गिरगाव; फडके गणपती मंदिर,गिरगाव आणि काळाराम मंदिर ठाकूरद्वार येथे १९८० ते १९९८ आशी सलग १८ वर्ष संपूर्ण ज्ञानेश्वरी सांगितली काळाराम मंदिर ठाकूर द्वार येथे अमृतानुभव चांगदेवपासाष्टी आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या निवडक अभंगावर निरुपण केले.

पुणे

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती टस्ट यांचे वतीने गेली पंचवीस वर्षे चातुर्मास प्रवचने . प्रवचन विषय -- श्री गणपती, श्रीएकनाथी रामायण, कृष्णाचरित्र, श्रीज्ञानेश्वरी ९ वा आणि १२ वा अध्याय. अमृतानुभव.