|
पुरस्कार प्राप्ती |
पुरस्कारामुळें महाराज की महाराजांमुळें पुरस्कार विशोभित हे कळू शकत नाही ,एवढे पुरस्कार त्यांनां जीवनभर मिळत रहिले, मिळत राहत आहेत, मिळत राहणार आहेत. या पुरस्कारांमध्ये श्री देवदेवेश्वर संस्थान, सारसबाग, पुणे, पुणे विद्यापीठ नामदेव अध्यासनतर्फे पुरस्कार, महाराष्ट्र शासनातर्फे व्यसनमुक्ती पुरस्कार, कार्यगौरव पुरस्कार, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती टस्ट,तिसरी जागतिक मराठी परिषद नवी दिल्ली, याशिवाय मुंबई, पुणे, पिंपरी, चिंचवड, सासवड, पैठण,अक्कलकोट, नागपूर, सोलापूर या नगरपालिकेतर्फे आणि महानगरपालिकांतर्फे त्यांना नागरी सत्कार देवून पुरस्कृत करण्यात आले आहे, पण संगीताच्या जगात एक विक्रमी कीर्तनकॅसेट विक्री बाबत राज्यपालांच्या हस्ते प्लॅटिनम डिस्क देऊन सरगम कॅसेटच्या वतीने गौरविलेले पहिले एकमेव कीर्तनकार महाराजच आहेत. |
|
पांडुरंगाची पगडी आणि अंगरखा देवून बडवे मंडळी तर्फे बाबाम्हाराजांचा गौरव |
|
गिरगाव, फलटण, सातारा ह्या सर्व भूषणपुरस्कार त्यांच्या आयुष्यात दोन पुरस्कार अत्यंत महत्वाचे, एक पंढरीत श्री पांडुरंगाची पगडी, आणि आळंदीत श्री ज्ञानेश्वर माऊलीची मेखला घालून मिळालेले पुरस्कार देवसंतांचा प्राप्त झालेला महान आशीर्वादच आहे. |
|
|
बाबा महाराज सातारकर यांना सातारकर फडातर्फे
मंत्र मंदिराची चांदीची प्रतिकृती भेट |
समग्र भाविकांची दृढ श्रध्दा आणि प्रेमाने सदगुरुपदपुरस्कार लाभलेल्या महाराजांना आता कोणत्या अन्य पुरस्काराने गौरविता येईल बरे । |
|
काय द्यावे यासी व्हावे उतराई । ठेविता हा पायीं जीव थोडा ।। |
|
|