श्री सद्गुरू दादा महाराज सातारकर फडाचा 110 वा पायी दिंडी सोहळा याचे सर्व updates आणि वर्षभरातील ईतर ही सर्व कार्यक्रमांची माहिती,
व्हिडिओ व फोटो खालील Instagram, YouTube आणि Facebook वर उपलब्ध आहे, Logo वर क्लिक करावे

सिध्द महाराज

महराजांचे ठायी सौंदर्यसिध्दी, स्वरसिध्दी, सुरसिध्दी, समाजसिध्दी, सरस्वतीसिध्दी, स्त्रीसिध्दी, श्रीसिध्दी, सदगुरुसिध्दी या अष्टमहासिध्दी एकवटलेल्या आसल्याने ते एक महान सिध्द महाराज तथा अवतारी संतसदगुरु आहेत म्हणूनच गावी वाटते त्यांची आरती.

आरती सदगुरु बाबा । ओवाळीते सदभावा।
आरती सदगुरु बाबा

तुम्ही भक्त भागवत । केले अवघ्या जना व्यसनमुक्त।।
आरती सदगुरु बाबा

तुम्ही दावुनी देवाचे स्वरुप । सुख दुःख त्याचीच रुप।।
आरती सदगुरु बाबा

तुम्ही देवुनी आधार । फुलिविले सकलांचे जीवन।।
आरती सदगुरु बाबा

करुनी आरती झाले जीवन कृतार्थ । माईचे पुरले मनोरथ।।
आरती सदगुरु बाबा