महाराजांच्या वेगवेगळ्या रागदारीतील ‘ रामकृष्णाहरी, हरी विठोबारुक्माई, राम श्रीराम जय जय राम आणि ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ’ प्राधान्याने या आणि या सम अनेक नामधुन भाविकभक्तांत अतिशय प्रिय झाल्या आहेत.
वारकरी संप्रदायाचा बीजमंत्र तथा महामंत्र ‘ रामकृष्णहरी ’ हा महाराजांनीच अप्रतिम रागदारीत आपल्या देवद-त स्वर्गिय भावपूर्ण सुरांत गाऊन शांभवी शक्तिसह जगभरच्या भाविकांसाठी सर्व लोकात लोकप्रिय केला.
आज सर्वत्र सर्वदूर प्रख्यात असलेला हा बीजमंत्र महाराजांच्या मधुर आवाजात सर्व कार्यक्रमात लावलेला पाहण्यास, ऐकण्यास मिळतो.