श्री सद्गुरू दादा महाराज सातारकर फडाचा 110 वा पायी दिंडी सोहळा याचे सर्व updates आणि वर्षभरातील ईतर ही सर्व कार्यक्रमांची माहिती,
व्हिडिओ व फोटो खालील Instagram, YouTube आणि Facebook वर उपलब्ध आहे, Logo वर क्लिक करावे

प़्रचारसाधने

वाढावया प्रेम भक्ति भाव धर्म ।
कुळाचारी नाम विठोबाचे ।।

कार्याच्या प्रचार प्रसारासाठी सर्व प्रकाराची साधने आधुनिक विचारसरणीचा त्यांनी अवलंब केला. त्या सर्वात त्यांना अपूर्व यश प्राप्त झाले.

ऊपस्थिती

चर्चा, संवाद, परिसंवाद, प्रमुख वक्ता, उदघाटक, अध्यक्ष, आशीर्वाद, ऊपस्थिती, सहगायक, मुख्य गायक, कीर्तनकार. पुणे विद्यापीठ श्री ज्ञानेश्वर अध्यासन निमंत्रित तज्ञ.

दुरचित्रवाणी

कैवल्याचा पुतळा ’ ही श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या सप्तजन्मशताब्दी निमित्त प्रसिध्द झालेली मालिका विशेषलोकप्रिय झाली,अजुनही ती लोकप्रिय आहे. अनाथांचा नाथ, हरिपाठ,सुप्रभात.याशिवाय वारकरी कीर्तनकार आणि भक्ति आणि वैराग्य याविषयांवरील त्यांच्या मुलाखती अतिशय लोकप्रिय झाल्या आहेत.

शिबीरे

लहान मुलांवर चांगले संस्कार व्हावेत आणि त्यांना संतविचारांच्या अभ्यासाची गोडी लागावी म्हणून सुट~टीत चैतन्यधाममध्ये शिबीरे आयोजित होतात. शिबीरातच अध्यात्मआवडीबरोबरच पोहणे, घोडदौड, पॅरासोलिंग, कराटे, रायफलशूटिंगचे वैज्ञानिक पातळीवरील ज्ञान मुलांनां दिले जाते.

वर्तमानपत्र

सातत्याने सर्वच वृत्तपत्रातील बातम्याचा विषय. मासिकः- महाराजांच्या आशीर्वादानेच संतविचाराचे प्रसारार्थ नागपूरहून ‘ चैतन्यप्रसाद ’ मासिक चालू आहे. फडावरील सर्व कार्यक्रमांची माहिती ,महाराजांच्या कीर्तन-प्रवचनांची, फडावरील विविध ऊपक्रमांची माहिती या मासिकाद्वारा मिळते.

सी.डी., व्ही.सी.डी

कीर्तनप्रवचनांच्या जवळपास शंभरहून अधिकच सी.डी. आणि व्ही.सी.डी.निघाल्या असुन आजही लोक त्या आवडीने घेत असतात. त्यांच्या विक्रमी खपाबाबत महाराजांना प्लॅटिनम डिस्क देवून तत्कालीन राज्यपालांच्या हस्ते गौरविण्यात आले आहे.

विदेश दौरा

लंडन - प्रवचने व बीबीसी वर मुलाखत.

यू.एस.ए. - १९८६ मध्ये १९ प्रवचने विविध ठीकाणी प्रवचने

आकाशवाणी

मुलाखती, स्लाईडशो प्रसिध्द.

इंटरनेट

दिनांक ९-२-१९९८ ला ऐश्वर्यवती श्रीज्ञानेश्वरी त्यांनी जगासाठी इंटरनेटवर आणली आहे.

ट्रस्ट स्थापना

या सर्व प्रचारकार्यासाठी म्हणून महाराजांनीं ट्रस्ट स्थापन केला. श्री चैतन्य आध्यत्मिक ज्ञान प्रसार संस्था, महाराष्ट्र, या नावाने इ. सन १९८३ मध्ये निर्माण केला. बाबामहाराज पेट्रन ट्रस्टी आहेत. उपाध्यक्षा कौसल्या गोरे. बाबा महाराज सातारकर ज्ञानपीठ प्रतिष्ठान दुसरा ट्रस्टही इ. सन १९९० मध्ये नोंदविला. संस्थापक अध्यक्ष -बाबा महाराज सातारकर हे दोन्ही ट्रस्ट मुंबई सार्वजनिक विश्वस्त नियम इ. सन. १९५० खालीं नोंदणीकृत केलेले आहेत. या दोन ट्रस्टच्या माध्यमातून प्रकल्पाची कामे केली आहेत. पण महाराजांच्या संकल्पनेने.