श्री सद्गुरू दादा महाराज सातारकर फडाचा 110 वा पायी दिंडी सोहळा याचे सर्व updates आणि वर्षभरातील ईतर ही सर्व कार्यक्रमांची माहिती,
व्हिडिओ व फोटो खालील Instagram, YouTube आणि Facebook वर उपलब्ध आहे, Logo वर क्लिक करावे

व्यक्तिमत्व

पुत्र, पिता, पती, बंधु, सखा, मित्र, सदगुरु या सर्वच भुमिका, आपल्या जीवनात महाराज अगदी सहज लीलया पेलत असतात. परिवाराला फडाला, समाजाला त्यांच्या प्रेमाने बाधुन ठेवले आहे. कीर्तनकलेचा परिपूर्ण अविष्कार म्हणजे बाबामहराज हे खरेच आहे. याबरोबरच महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे अनेकही अनोखे पैलू आहेत. बालपणी त्यांना घोडेसवारी, क्रिकेट, बोटिंग, ट्रकिंग, शुटिंग, स्विमींग या सर्वात अभ्यासाबरोबरच रस होता. फोटोग्राफी त्यांचा आवडता छंद आहे. कलाकुसर, अनोख्या रचनांची त्यांची आवड, लाकूड, दगड, चित्रे, इमारती आणि प्रसंगी जुळीतही उठुन दिसते

एक अत्यंत उत्कृष्ट गायक एक महान कीर्तनकार, एक कसलेला शेतकरी, उत्तम फर्निचर व्यावसायिक, वारकरी विश्वाची बाजू समर्थपणे मांडणारा स्वयंभू पदवी असलेला वकील शब्दाच्या खेळाने तथा कोटीने मजा उडवून देत अंर्तमुख करणयास लावणारा एक कोटयाधीश, फडावरील सकळा आधार देणारा समर्थ सदगुरु, समाजाला देवदत्त स्वर्गिय सुस्वरां च्या स्वशक्तिपाताने सन्मार्गा नेणारा महामानव, परिवारातील स्वजनांना आपली थोरीव विसरुन आपला जिवलग, सखा वाटणारा मायबाप अशा अनेकविध पैलूनीं प्रकाशणारे महाराजांचे व्यक्तिमत्व बहु आयामी आहे.

निर्सग, प्राणी, माणसे, कला, संगीत, भजनकीर्तन, परमेश्वर, जीवनावर भरभरुन मनस्वी प्रेम करणारे कलंदर दिलखुलास, गंगेच्या जलासम पावन आणि पारदर्शी तरीही अति परखड, समर्थ, राजस, लोभस असे त्यांचे व्यक्तिमत्व सर्वांना खिळवून ठेवते, हे मात्र वास्तव सत्य आहे.

अजोबा आणि नातु बाबा महाराज

अजोबा आणि नातु चिन्मय

परिवार

२४ मार्च सन १९५४ साली देशमुख दिंडीचे वीणेकरी श्री पांडुरंग जाधव यांच्या सुलक्षणी नात दुर्गा हिने एका गोरज मुहूर्तावर सकलसौभाग्यसंपन्न रुक्मिणी बनून महाराजांच्या जीवनात लक्ष्मीच्या पाऊलांनीं पदार्पण केले. त्यांच्या संसारवेलीवर सम १९५८ ला भगवती, १९६२ ला रासेश्वरी, सन १९६३ ला चैतन्य अशी फुले ऊमलली. एक भाग्यशाली संसार विश्वकल्याणार्थ अवतीर्ण झाला.

श्री चैतन्य महाराज,सातारकर संत परंपरेतील एक छोटीशी कळी। न उमलता अकस्मात माऊलींच्या चरणीं गळून पडली. त्याना ज्ञानेश्वरीचे चार अध्याय पाठ होते. लहानपणापासुनच महाराजांचे मागे कीर्तनांत ऊत्कृष्ट लयबध्द टाळ वाजवित असत. वारीच्या वाटेने दिंडीत असले की सर्व टाळकरी मंडळी एकदम खूष असत. त्यांच्या नाचण्यातही बाबा महाराजांसारखा डौल होता. महाराजांच्या कीर्तनात माईक सारखा करता करता ते माईकरुपच झाले. चैतन्य जसा त्यांचा आत्मा होता, तसेच त्यांच्या कार्यक्रमाचा ‘‘ माईक व आवाज ’’ हा आत्माच होय. म्हणूनच त्यांना माईक सिस्टिम कीर्तनासाठी ऊत्तम लागते. मला वाटते,त्यांच्यासमोर माईक नसून चैतन्यच उभा असतो व ते त्याच्या माध्यमातून बोलत असतात.

महाराजांच्या जीवनात, दुधात साखर विरघाळावी तशा समरस झालेल्या त्यांच्या कांता सौ. रुक्मिणी यासुध्दा सर्वांच्या आईसाहेब बनून गेल्या.सावलीसारखी महाराजांच्या कार्यात सदैव सोबत राहून जी सेवा, सहकार्य करीत आहेत ते खरोखरच अद्भूत असे कार्य आहे.

पन्नास वर्षांच्या अपूर्व आनंदाच्या संसारपूर्ति नंतर परत दोघांच्या विवाहासोहळ्याचे भाग्यदेखील महाराजांचे पदरी घालून देवाने स्वताःलाच धन्य मानले असावे.

महाराजांच्या सा-या अलौकिक जीवनाचा सोनेरी कलश, तथा परिपूर्णता म्हणजे या सर्वाबरोबरच महाराजांच्या मोठया भगिनी कौसल्या याही अविवाहित राहून या परिवाराच्या विश्वकल्याणकार्यांत मोठया बहिणीची भुमिका निभावत, आजही सदैव निशब्द सक्रीय समर्थ साथच करीत असतात. माई आणि महाराज ही जोड आजही चिन्मय आणि दर्शनी रुपे परावर्तित झाल्यासारखी आज तरी वाटत आहे.

सर्वच नात्यांच्या अलौकिक प्रेमाचे दर्शन म्हणजेच बाबामहाराजांचे जीवन हेच खरे वास्तव होय.

त्रिवेणी