श्री सद्गुरू दादा महाराज सातारकर फडाचा 110 वा पायी दिंडी सोहळा याचे सर्व updates आणि वर्षभरातील ईतर ही सर्व कार्यक्रमांची माहिती,
व्हिडिओ व फोटो खालील Instagram, YouTube आणि Facebook वर उपलब्ध आहे, Logo वर क्लिक करावे

समावेशकता

या रे या रे लहानथोर, याति भलते नारी नर अशी संतवचनाची साद घालत महाराज संतांनी दिलेल्या या सकळासी अधिकार असणा-या नामभक्तिप्रेमाच्या आनंदात सर्वानांच आपल्या देवदत्त स्वर्गीय सुर स्वरसामार्थ्याने सदगुरुकृपेने न्हाऊ घालतात. यामध्ये सामान्य भाविक वारकरी स्त्रीपुरुष तर असतातच, पण त्यांचेबरोबर समाजकारणी, राजकारणी तसेच थोर थोर महात्म्ये महासाधुसंतही आहेत. सामान्य भोळा भाबडा वारकरी तर महाराजांचे जणु काय आराध्य दैवतच.